
हैदराबादमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटाने मुरली यांचे घर कोसळले, एकाचा मृत्यू आणि तिघे जखमी.
स्फोटामुळे घराचा ढिगारा रस्त्यावर कोसळला, ज्यामुळे पादचाऱ्यांवरही परिणाम झाला.
पोलिस आणि अग्निशमन दल तपास करत असून, गॅस गळती हे स्फोटाचे संभाव्य कारण आहे.
Gas cylinder explosion video : हैदराबादच्या मेडचल परिसरात एका गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटाने संपूर्ण घर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. हा थरकाप उडवणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.