
Viral Video : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात रविवारी काल सकाळपासून एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. परिसरात इराणचे झेंडे आणि तेथील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली.