M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

Video MS Dhoni Birthday Celebration: महेंद्रसिंग धोनी यांनी रांचीत आपला ४४वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला. त्यांच्या केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
M S Dhoni Birthday
M S Dhoni Birthday Celebration Videoesakal
Updated on
  • धोनीने रांचीत ४४वा वाढदिवस साजरा केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • २०२५ च्या आयपीएलमध्ये CSK ची कामगिरी निराशाजनक राहिली, पण धोनीने निवृत्ती जाहीर केली नाही.

  • CSK ने धोनीला ४ कोटी रुपयांत 'अनकॅप्ड' खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे.

MS Dhoni Birthday Video : भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांनी आज आपला ४४वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रांचीतील त्यांच्या राहत्या घरी काही जिवलग मित्रांसह धोनी केक कापताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे निश्चित सांगता येत नसले तरी चाहत्यांचा अंदाज आहे की तो झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या (JSCA) प्रांगणातील असू शकतो.

क्रिकेटमधील योगदान

दरवर्षी ७ जुलैला धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्ये खास उत्साह असतो. यंदाही त्यांच्यावरील प्रेम सोशल मीडियावर उफाळून आलं आहे. "व्हिडिओ ऑफ द डे" म्हणून ओळखला जाणारा हा व्हिडिओ पाहून देशभरातील क्रिकेटप्रेमी पुन्हा एकदा भावूक झाले आहेत.

महेंद्रसिंग धोनी हे जागतिक क्रिकेटमध्ये एकमेव असे कर्णधार आहेत ज्यांनी ICC च्या सर्व तीन प्रमुख व्हाइट बॉल ट्रॉफीज, टी20 वर्ल्ड कप (2007), वनडे वर्ल्ड कप (2011) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) आपल्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्यांनी 2004 ते 2019 या कालावधीत भारतासाठी १७,२६६ आंतरराष्ट्रीय धावा केल्या. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

M S Dhoni Birthday
Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

आयपीएलमधील धोनीचा प्रवास

धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळत आहेत. २०२५ च्या हंगामात त्यांनी ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे काही सामने कर्णधार म्हणूनही खेळवले. मात्र २०२५ चा सीझन CSK साठी फारसा चांगला ठरला नाही. संघाला केवळ ४ विजय मिळाले आणि ते पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर राहिले.

चाहत्यांना धोनीच्या निवृत्तीची घोषणा अपेक्षित होती. पण धोनीने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामना संपल्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना धोनी म्हणाले, "हे माझ्यावर अवलंबून आहे. मी सध्या काहीच सांगणार नाही. चार-पाच महिने आहेत निर्णय घेण्यासाठी. वेळ आहे माझ्याकडे. शरीरावर ताण न देता खेळता येईल का, हे पाहावं लागेल. यावेळी काही बाइक रायड्स आणि रांचीतील शांत आयुष्य जगत आहे."

M S Dhoni Birthday
Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने धोनीला केवळ ४ कोटी रुपयांत कायम ठेवले. BCCI च्या नवीन नियमांमुळे, निवृत्तीनंतर ५ वर्षांचा कालावधी झाल्याने धोनीला ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून गृहित धरता आले आणि त्यामुळे त्याच्या कायम ठेवण्याची प्रक्रिया सुलभ झाली.

महेंद्रसिंग धोनी हे फक्त एक क्रिकेटपटू नाहीत, तर कोट्यवधी चाहत्यांसाठी एक प्रेरणा, एक भावना आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यावरील प्रेमाची लाट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पुढील IPL हंगामात धोनी पुन्हा दिसतील का, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी त्यांच्याबाबतची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.

4 FAQs

  1. एमएस धोनीने वाढदिवस कुठे साजरा केला?
    ➤ धोनीने रांचीत आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला.

  2. धोनीने कितवा वाढदिवस साजरा केला?
    ➤ धोनीने ४४ वा वाढदिवस साजरा केला

  3. धोनी IPL 2026 मध्ये खेळणार का?
    ➤ धोनीने अद्याप यावर स्पष्ट उत्तर दिलेले नाही; त्यांनी निर्णयासाठी वेळ घेतला आहे.

  4. CSK ने धोनीला किती रकमेने कायम ठेवले?
    ➤ CSK ने धोनीला ४ कोटी रुपयांत 'अनकॅप्ड' खेळाडू म्हणून कायम ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com