Video : दिल्लीकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये फ्री धबधबा! छतातून पाण्याचा लोंढा; सीट अन् सामान भिजले, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Delhi Vande Bharat Water Leakage Video: दिल्लीकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये छतातून पाणी गळती झाली. प्रवाशांना त्यांच्या सीटवर आणि सामानावर पाणी पडून ते भिजल्याने त्रास सहन करावा लागला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Delhi Vande Bharat Water Leakage Video
Delhi Vande Bharat Water Leakage Videoesakal
Updated on

Delhi Train Viral Video : दिल्लीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका डब्यातून छतातून पाणी गळू लागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये पाणी थेट प्रवाशांच्या सीटवर आणि सामानावर पडताना दिसते. एक मुलगी यावेळेस अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्या गळतीला पाहताना आणि पाण्यापासून वाचताना दिसत आहे.

या व्हिडिओला शेअर करताना एका युजरने मजेशीरपणे म्हटले की, "दिल्लीकडे जाणाऱ्या 22415 वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक अनोखा 'फ्री' वॉटरफॉल सर्व्हिस प्रवाशांसाठी सुरू झाला आहे."

2024 मध्येही याच वंदे भारत ट्रेनमध्ये अशीच पाण्याची गळती झाली आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला , ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र टीका झाली होती. त्या वेळी उत्तर रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण दिले गेले होते की, "तांत्रिक कारणांमुळे काही वेळा पाईपमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे थोडीशी पाणी गळती झाली. मात्र संबंधित कर्मचारीनी लगेच त्यावर कारवाई केली आणि ते दुरुस्त केले. या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत."

Delhi Vande Bharat Water Leakage Video
Viral Video : वारीत चोरीचा थरार! मंगळसूत्र हिसकावताना महिलेला रंगेहाथ पकडलं, VIDEO पाहून शॉक व्हाल..

यंदाच्या गळतीने लोकांची लक्ष वेधले तेव्हा दिल्ली आणि आसपासच्या एनसीआर भागात मंगळवारी हलका पाउस झाला. हवामान विभागाच्या (IMD) अहवालानुसार, दिल्लीच्या नरेला, बावाना, आलिपुर, कंजवाला, रोहिणी, पाश्चिम विहार, पालम, IGI विमानतळ आणि एनसीआरच्या गुरुग्राम, बहादुरगड यांसह अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Delhi Vande Bharat Water Leakage Video
Viral Video : सिलेंडरमधून गॅस गळती; ब्लास्ट झाला अन् दोघांनी...,भयंकर व्हिडिओ व्हायरल, अशी घ्या घरच्या सिलेंडरची काळजी

रेल्वे आणि प्रवाशांसाठी अशी गळती ही एका आधुनिक आणि अभिमानास्पद म्हणावयाच्या वंदे भारत ट्रेनसाठी निंदनीय ठरली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सुविधा आणि देखभाल याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ रेल्वे प्रशासनाला आली आहे. या प्रकारांमुळे प्रवाशांचा रेल्वेविषयीचा विश्वास घटू नये, अशी अपेक्षा आहे.

पाणी गळतीचा प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने पुढाकार घेतले पाहिजे, तसेच पुढील काळजीपूर्वक तपासणी आणि नियमित देखभाल सुनिश्चित केली पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com