
Bengaluru Metro Station Couple Video : बेंगळुरूमधील मडवारा मेट्रो स्थानकात एका तरुण-तरुणीने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अश्लील वर्तनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच दोघांनी अत्यंत अश्लील आणि अशोभनीय कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी वृद्ध, महिला आणि लहान मुले देखील उपस्थित होती.
हा व्हिडिओ ‘Karnataka Portfolio’ नावाच्या युजरने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. “बेंगळुरू आता दिल्ली मेट्रो संस्कृतीकडे वाटचाल करत आहे का?” असा सवाल पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, "सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करताना कोणताही विचार न करता इतरांचा सन्मान न ठेवणं हे अत्यंत खेदजनक आहे. मडवारा मेट्रो स्थानकावर घडलेली ही घटना धक्कादायक आहे. अशा जागांमध्ये जिथे सर्वसामान्य नागरिक, महिला, मुले आणि वृद्ध ये-जा करत असतात, तिथे सार्वजनिक अश्लीलता माफक आहे असं समजणं ही मानसिकतेची अधोगती दर्शवते."
यावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. "आपण पुढच्या पिढीसाठी नेमकं कोणता आदर्श ठेवत आहोत?" असा सवाल एका युजरने उपस्थित केला, तर दुसऱ्याने “सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तनाविरुद्ध अधिक कठोर कायदे हवेत,” अशी मागणी केली.
या प्रकरणावर अद्याप बेंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, या व्हिडीओची स्वतंत्रपणे खातरजमा करण्यात आलेली नाही, असंही India Todayने स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे, काही नेटकर्यांनी हा व्हिडीओ शूट करून अपलोड केल्याबद्दल नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. “दोन चुकीच्या गोष्टी एक बरोबर होत नाहीत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणंही चुकीचंच आहे. जर त्या व्यक्तीला वर्तन अयोग्य वाटलं, तर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करायला हवी होती, सार्वजनिक बदनामी नव्हे,” असं मत काही वापरकर्त्यांनी मांडलं.
गेल्या वर्षी देखील कोलकाताच्या कालीघाट मेट्रो स्थानकावर अशाच प्रकारचा एक कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील सोशल मीडियावर मतविभाजन झालं होतं. काहींनी ते साधं प्रेम व्यक्त करणं आहे असं म्हटलं, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा कृतींना विरोध केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.