Babar Azam dismissed for duck by Mohammad Amir पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याची पाकिस्तान सुपर लीगमध्येही निराशाजनक कामगिरी सुरू असल्याचे दिसले. पेशावर झाल्मी संघाचा कर्णधार असलेला बाबर क्वेत्ता ग्लॅडिएटर्सविरुद्ध पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर भोपळ्यावर बाद झाला. मोहम्मद आमीरने ही विकेट मिळवल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या बाबरला जर्सीवरील त्याचे नाव बोटाने दाखवले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सईम अयूबसोबत ग्लॅडिएटरच्या गोलंदाजांचा जबरदस्त राडा झाला.