Viral Video : लग्नात डान्स करता करता कोसळला; हृदयविकाराचा झटक्याने तरूणाचा मृत्यू

हा तरूण फक्त १९ वर्षाचा आहे.
Viral Video
Viral VideoSakal

तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण सध्या खूप वाढले असून २० ते ४० वयोगटातील अनेक तरूणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक १९ वर्षाचा तरूण लग्नामध्ये डान्स करता करता हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळल्याचं दिसत आहे. यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे.

Viral Video
डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा तेलंगणा येथील असल्याची माहिती आहे. तेलंगणा येथील निर्मल जिल्ह्यातील ही घटना असून लग्नासाठी महाराष्ट्रातून तेलंगणा येथे हा तरूण गेला होता. लग्न समारंभात हा तरूण रात्रीच्या वेळी गाण्यावर डान्स करता करता खाली कोसळला. कोसळल्यानंतर या तरूणाचा काही क्षणात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून अनेकांना यामध्ये जीव गमवावे लागले आहेत. कोणताही आजार नसताना किंवा निरोगी शरीर असताना हृदयविकाराचे झटके येत आहेत. तर सध्या ही चिंतेची बाब ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com