
Independence Day 2025: १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री, जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसद भवनात संविधान सभेला उद्देशून ऐतिहासिक ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ भाषण केले. हे भाषण केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव नव्हता, तर एका नव्या युगाचा प्रारंभ आणि राष्ट्राच्या आत्म्याचा जागर होता. हे २०व्या शतकातील सर्वोत्तम भाषणांपैकी एक मानले जाते.