
Mock Drill: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांची बचावासाठीची सुसज्जता म्हणजे मॉक ड्रिल. केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबत आदेशही काढलेत. त्यानुसार उद्या, बुधवार ७ मे २०२५ रोजी देशभरात संध्याकाळच्या वेळेत हे मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम केली जाणार आहे. यावेळी मोठ-मोठ्याने सायरन वाजवले जातील, हे इशाऱ्यासाठी असतात. या इशाऱ्यानंतर नागरिकांनी काही गोष्टी करणं अपेक्षित आहेत. यावेळी नागरिकांनी नेमकं काय करायचं? यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.