
WhatsApp Down: एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी महत्वाचं साधन असलेलं व्हॉट्स अॅप गेल्या तासाभरापासून डाऊन झालं आहे. युजर्सना स्टेट्स अपडेट करताना तसंच ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करताना अडचण येत आहे. मेसेजच डिलिव्हर होत नसल्यानं युजर अक्षरशः वैतागले आहेत. पण यावर अद्याप कुठलंही स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाकडून देण्यात आलेलं नाही.