

Rajasthan’s viral social media creator Moti Meghwal
esakal
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून असलेला मोती मेघवालने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मोती मंडेला’ आणि ‘मोती मेघवाल’ या नावांनीही ओळखल्या जाणाऱ्या मोतीला आता ‘एलियन स्टार’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील वेगळ्या लूकमुळे बालपणी त्याची चेष्टा केली जात होती. मात्र, याच वेगळेपणाला त्याने कमकुवतपणा न बनवता स्वतःची ताकद बनवली आणि सोशल मीडियावर नवी ओळख निर्माण केली.