Manish Kashyap : कोण आहे मनीष कश्यप? 4 बँकेचे अकाउंट फ्रीज अन्...वाचा सविस्तर l who is manish kashyap bihar police freeze 4 bank account know the profile of manish kashyap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Kashyap

Manish Kashyap : कोण आहे मनीष कश्यप? 4 बँकेचे अकाउंट फ्रीज अन्...वाचा सविस्तर

Manish Kashyap : सध्या सोशल मीडियावर मनीष कश्यपच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचे एकूण चार बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहे. त्याच्यासह युवराज सिंहला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी विशेष टीमही तयार करण्यात आली आहे. हा मनीष कश्यप नेमका आहे तरी कोण जाणून घेऊया सविस्तर.

तामिळनाडूमध्ये बिहारी मजुरांचे फेक व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोप प्रकरणी बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेने युट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) आणि युवराज सिंह दोघांनाही अटक करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणी सातत्याने छापेमारी सुरु असताना युट्यूबर मनीष कश्यपचे बँक अकाऊंट फ्रीज करण्यात आलं आहे. याबाबत बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे.

फेक व्हिडीओ केला होता व्हायरल

मनीष कश्यपने तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारी मजुरांचा फेक व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर मनीषचे ट्विटर हँडल अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. मनीष आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केल्याचा दावा काही फेक अकाऊंटवरुन केला जात आहे. पण दोघांनाही अटक करण्यात आली नसल्याचे बिहार पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोण आहे मनीष कश्यप?

मनीष कश्यप उर्फ ​​त्रिपुरारी कुमार तिवारी यांने सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांनी यूट्यूबवरुन पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच 2020 मध्ये मनीषने चणपटिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

मनीष कश्यपच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम फ्रीज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रीज झालेल्या सर्व खात्यांमध्ये एकूण 42 लाख 11 हजार 937 रुपये जमा आहेत. मनीषशी जोडलेली चार खाती फ्रीज झाली आहेत.

पोलिसांच्या ट्विटर पोस्टनुसार, मनीषच्या एसबीआय खात्यात 3 लाख 37 हजार 496 रुपये होते. आयडीएफसी बँकेच्या खात्यात ५१ हजार ६९ रुपये आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यात ३ लाख ३७ हजार ४६३ रुपये जमा आहेत.