Viral Video : दारू पिला अन् 40 फूट फ्लेक्सवर लटकला; प्रशासनाची तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : दारू पिला अन् 40 फूट फ्लेक्सवर लटकला; प्रशासनाची तारांबळ

दारू पिल्यानंतर व्यक्ती काय करेल याचा नेम नसतो. मद्यपान केल्यानंतर सर्वांचेच भान हरपलेलं असतं त्यामुळे नशेत आपण काय करतो हे त्या व्यक्तीला कळत नाही. त्यामुळे दारू पिऊन रस्त्याच्या कडेला झोपलेले अनेकजण आपण पाहिले असतील. पण एक अवलिया थेट ४० फुट उंचीच्या फ्लेक्सला लटकला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ येथील आहे. एका जाहिरातीच्या बोर्डवर नशेतील व्यक्ती लटकलेला दिसत आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडालेली आपल्याला दिसत आहे. तर एका बस चालकाने आपली बस त्याच्या खाली आणली आणि त्यानंतर दारूच्या नशेतील व्यक्ती त्या बसवर उडी मारतो. पण या वेळेत त्याने प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी या तरूणाला खाली उतरवलं आहे. या घटनेदरम्यान रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी सदर व्यक्तीवर कारवाई केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Wineviral video