Woman Travels 600 KM Daily by Plane: आपल्यापैकी अनेक जण ऑफिसला जाण्यासाठी स्वतःची गाडी, बस किंवा रेल्वेचा वापर करतात. पण, कुणी जर रोज विमानाने ऑफिसला जातंय, असं म्हटलं तर? हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. मात्र, हे खरं आहे. एक महिला रोज चक्क विमानाने ऑफीसला जाते. रेचल कौरची असं या महिलेचं नाव आहे. रेचल कौर या भारतीय वंशाच्या असून मलेशियामध्ये स्थायिक आहेत.