
एक धक्कादायक घटना सध्या व्हायरल होत आहे
महिला घरी विवस्त्र झोपली असताना तिला काही कामगारांनी पाहिले
या धक्कादायक घटनेनंतर पुढे काय झाले, जाणून घ्या
China woman viral news : चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जोडप्यासोबत धक्कादायक घटना समोर आली आहे. या जोडप्याने मालमत्ता व्यवस्थापन कंपनीवर गंभीर आरोप केले असून जाहीर माफी आणि भाड्यात मोठी सूट देण्याची मागणी केली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यामुळे खळबळ उडाली आहे.