Video Viral : भगव्या बिकीनीवरून पेटलेला वाद आईस्क्रीमपर्यंत; महिलेने कँडी चाटत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : भगव्या बिकीनीवरून पेटलेला वाद आईस्क्रीमपर्यंत; महिलेने कँडी चाटत...

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींना घातलेल्या भगव्या बिकीनीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता एका महिलेने भगवा रंग हा भाजपने विकत घेतला का असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती भगव्या रंगाची आईस्क्रीम खाताना दिसत आहे. तर "ही भगव्या रंगाची आईस्क्रीम आहे, भाजपचं कॉपीराईट आहे का या आईस्क्रीमवर? ही माझी आईस्क्रीम आहे, मी चाटणार..." असं ती महिला या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

दरम्यान, पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. तर भाजपकडूनही या चित्रपटाचा विरोध करण्यात आला होता. त्यामुळे भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने हिंदू धर्माची बदमानी होते असं सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या महिलेने भगव्या रंगाची आईस्क्रीम खात भाजपला प्रश्न केला आहे.

टॅग्स :Bjpwomenviral video