
Viral Video : '...अन् इलॉन मस्क ढसाढसा रडला!' टेस्लाची इलेक्ट्रिक कार घेऊन 'ती' गेली पेट्रोल भरायला
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ परदेशातील असून दोन महिला इलॉन मस्क यांचा ब्रँड असलेला टेस्लाची इलेक्ट्रिक कार घेऊन पेट्रोल पंपावर गेल्या आहेत. तर या महिलांना अनेकांनी ट्रोल केलं आहे.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला पेट्रोल पंपावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे टेस्लाची इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीसाठी चार्जिंगची गरज असते हे त्या महिला कदाचित विसरल्या असतील. तर काही जणांनी त्यांचा हा व्हिडिओ शूट केला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून इलॉन मस्क ढसाढसा रडला असेल अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर त्यावर अनेक विनोदी प्रतिक्रिया आल्या असून काही व्यक्तींनी हसण्यापेक्षा त्यांना मदत करायला हवी होती असंही मत काही युजर्सनी व्यक्त केलं आहे.