Teacher Dance : 'हर हर शंभू' गाण्यावर शिक्षिकेचा वर्गात डान्स; पाकिस्तानात Viral झाला Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Teacher Dance : 'हर हर शंभू' गाण्यावर शिक्षिकेचा वर्गात डान्स; पाकिस्तानात Viral झाला Video

काही शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील असतात. ते विद्यार्थ्यांसाठी आपला जास्तीत जास्त वेळ समर्पित करत असतात. आपले विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असावेस असं त्यांना वाटत असतं. तर अशाच एका कार्यशील शिक्षिकेच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

या व्हिडिओमध्ये शिक्षिका आपल्या शाळेतील मुलांना डान्स शिकवत आहेत. हर हर शंभू या गाण्यावर त्या डान्स करत असून विद्यार्थी त्यांचा डान्स पाहून स्वत: डान्स करत आहेत. या डान्सची भुरळ पाकिस्तानी नागरिकांनाही पडली असून पाकिस्तानात हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, तरेक फतह या पाकिस्तानी नागरिकाने हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला असून 'भारतातील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी डान्स करत आहेत' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.