
टिंडरवर ओळख झाली, तिच्या भेटीला गेला, भेटही झाली पण येताना विपरीत घडलं अन्... | Tinder Date
डेटिंग अॅपवर मैत्री करून मैत्रिणीला भेटणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. टिंडरवर ओळख झालेल्या मैत्रीणीला भेटून येताना एका तरूणासोबत मोठा अनर्थ घडला आहे. त्यामुळे त्याला चांगलीच अद्दल घडली असून त्याची या जाळ्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
टिंडर या डेटिंग अॅपवर एका ३६ वर्षाच्या युवकाची ओळख एका मैत्रिणीशी झाली आणि तो तिला भेटण्यासाठी एका हॉटेलात गेला. तिथे त्यांची भेट झाली, गप्पा झाल्या पण त्यानंतर परत येत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. त्याने घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली पण त्या कॅबमध्ये आधीच तीन लोकं होती. तो ज्यावेळी गाडीत बसला त्यावेळी त्याला जबर मारहाण करण्यात आली.
दरम्यान, हा प्रकार घडत असताना पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांनी मध्यस्थी केली. याप्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरसहीत तिघांना अटक केली आहे. पण या तरूणाला टिंडरवरून ओळख झालेल्या तरूणीला भेटणे चांगलेच महागात पडले आहे. हा प्रकार इस्त्राईलमध्ये घडला आहे.