Viral Video : ब्रेकऐवजी दाबलं एक्सलरेटर; 'पापा की परी' पुलावरून थेट नाल्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : ब्रेकऐवजी दाबलं एक्सलरेटर; 'पापा की परी' पुलावरून थेट नाल्यात

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये मुलींच्या डान्सचे, लग्नातील व्हिडिओ किंवा लहान मुलांचे विनोदी व्हिडिओ असातात. सध्या एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती गाडी चालवताना थेट नाल्यात जाऊन पडली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शूट केला गेलेला आहे. एक तरूणी गाडीवर पूल ओलांडत असताना तिच्या हातून ब्रेक दाबण्याऐवजी चुकून एक्सलरेटर दाबला गेला. त्यामुळे गाडीचा वेग वाढला आणि तरूणीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ती थेट पुलावरून नाल्यात पडली. गाडीसहित नाल्यात पडल्यामुळे या अपघातात ती जखमी झाली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला ४ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत. "आता थेट किचनमध्ये जा", "पापा की परी थेट नाल्यात" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.