
Viral Video : तरूणाची एक हाक अन् आकाशात जमा झाले कावळ्यांचे थवे
कावळा हा खूप चतूर प्राणी असतो. त्याला एकच डोळा असतो असं म्हणतात. तर दशक्रिया विधीसाठी कावळ्याला खूप महत्त्व असते. कधीकधी दशक्रिया विधीसाठी कावळ्याने पिंडाला स्पर्श केला नाही तर कावळा येईपर्यंत वाट पहावी लागते. एवढं महत्त्व कावळ्याचं आहे.
पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून एका तरूणाने आवाज देताच कावळ्याचे थवे आकाशात जमा झाल्याचं दिसत आहे. आकाशात एकही कावळा नसताना त्याच्या आवाजाने अनेक कावळे जमा झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण एका ग्राऊंडवर उभे असल्याचं दिसत आहे. तर त्यातील एक तरूण वेगळ्या प्रकारचा आवाज काढून कावळ्यांना आपल्याकडे बोलावत आहे. त्याच्या आवाजाने कावळे कसे जमा होतात असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.