

dus rupye wala biscuit shadab jakati
esakal
'दहा रुपयांचे बिस्किट कितीला आहे?' या प्रसिद्ध संवादातून सोशल मीडियावर चर्चेत आलेला मेरठचा युट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जकातीसोबत व्हिडिओंमध्ये काम करणाऱ्या एका महिला सह-कलाकाराच्या पतीने इंचौली पोलीस ठाण्यात धाव घेत मोठा गदारोळ केला. आपली पत्नी आणि जकाती मिळून आपल्याला जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोप या पतीने केला आहे. पोलीस ठाण्यात रडत असताना त्याने स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची मागणी केली.