Video Viral : इलॉन मस्ककडे युट्यूबरची मिठी मारण्याची इच्छा; मस्कचे ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elon musk

Video Viral : इलॉन मस्ककडे युट्यूबरची मिठी मारण्याची इच्छा; मस्कचे ट्वीट चर्चेत

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, ट्वीटरचे आणि टेस्लाचे मालक एलन मस्क हे आपल्या वेगळ्या स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका प्रसिद्ध युट्यूबरला मस्क यांना मिठी मारण्याचे स्वप्न पूर्ण झाले युट्यूबर Fidias Panayiotou याने एक प्रयोग केला होता. तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ट्वीटरच्या कार्यालयाबाहेर या युट्यूबरने तळ ठोकून Hug me Elon असं लिहिलेला बोर्ड घेतला होता. त्यानंतर फिफा विश्वचषकात एका तरूणाने मस्क यांना या युट्यूबरला एक मिठी मारण्यासाठी सांगितलं. त्यानंतर मस्क यांनी ट्वीट टाकत या तरूणाला मिठी मारण्यासाठी हो म्हटलं आहे. त्यानंतर हा युट्यूबर खूश झाला असून त्याचा त्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो या व्हिडिओमध्ये खूश असल्याचं दिसत आहे.

दुसऱ्या एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मस्क हे लहान मुलांना भेटत आहेत. तर काही मुले त्यांना मिठी मारण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. पण मस्क हे या लहान मुलांशी हात मिळवत पुढे जात असताना दिसत आहेत.

टॅग्स :tweetElon Muskviral video