खऱ्याखुऱ्या झेब्राने झेब्रा क्रॉसिंगवरून केला रोड क्रॉस; पब्लिक हैराण | Video Viral

हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.
Zebra Cross the Road
Zebra Cross the RoadSakal

सैरावैरा धावत सुटलेल्या झेब्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. "खऱ्याखुऱ्या झेब्राने झेब्रा क्रॉसिंगवरून रोड क्रॉस केला" अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ दक्षिण कोरिया येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्राणीसंग्रहलयातून हा झेब्रा सुटला आणि रस्त्यावर सैरावैरा धावू लागला. प्राणीसंग्रहालयात त्याला कोंडून ठेवलं असल्यामुळे मोकळ्या रस्त्यावर त्याला कुठे जावं ते कळत नव्हतं, त्यामुळे जिकडे वाट दिसेल तिकडे तो सैरावैरा धावत होता. दुपारी २.३० वाजता झेब्रा प्राणीसंग्रहलयातून सुटल्याची माहिती आहे. दक्षिण कोरिया येथील ग्वांगजिन-गु परिसरात ही घटना घडली. या घटनेमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Zebra Cross the Road
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

प्राणीसंग्रहालयाचे काही कर्मचारी या झेब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळानंतर तो एका रस्त्यावर धावताना त्याला पकडण्यात आले आणि परत प्राणीसंग्रहालयात सोडण्यात आल्याची माहिती आहे. पण हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com