Zomato Delivery on Horse : पेट्रोल मिळेना म्हणून पठ्ठ्याने काढला घोडा; झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

Zomato Delivery Boy : "ऑर्डर घेऊन निघालो, मात्र तीन तास रांगेत थांबूनही पेट्रोल मिळालं नाही.." असं हा डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला सांगत आहे.
Zomato Delivery boy viral Video
Zomato Delivery boy viral VideoeSakal

Zomato Delivery boy on Horse : ट्रकचालकांच्या देशव्यापी आंदोलनांमुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर भयंकर गर्दी पहायला मिळत आहे. कित्येक पेट्रोल पंप बंदही झालेले पहायला मिळाले. या सगळ्यात झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय (Zomato delivery boy) चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, तो डिलिव्हरीसाठी चक्क घोड्यावर जात आहे.

या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ हैदराबादच्या चांचलगुडा भागातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये तो घोड्यावर डिलिव्हरी करण्याचं कारणही सांगत आहे. (Zomato boy viral video)

"ऑर्डर घेऊन निघालो, मात्र तीन तास रांगेत थांबूनही पेट्रोल मिळालं नाही.." असं हा डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला सांगत आहे. यासोबतच तो व्हिडिओ घेणाऱ्या इतर लोकांनाही हात हलवून अभिवादन करताना दिसत आहे. (Zomato delivery on horse)

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पहायला मिळत आहेत. ट्रकचालकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी झोमॅटोनेच ही शक्कल लढवली असल्याची शक्यता नेटिझन्स व्यक्त करत आहेत. तर, अशा प्रकारे डिलिव्हरी करताना बॉक्समधील जेवण नीट राहिले असेल का? असा प्रश्नही एकाने उपस्थित केला आहे.

Zomato Delivery boy viral Video
ट्रक चालकांचा संप कशामुळे? हिट अँड रन कायद्याला विरोध का?

ट्रक चालकांचा संप मागे

दरम्यान, नवीन हिट-अँड-रन कायद्याविरोधात असणारा ट्रक चालकांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. सरकारने या कायद्यावर पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. या नवीन कायद्यामध्ये अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली होती. याला ट्रकचालकांनी विरोध केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com