esakal | झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagn bhujbal and mamta banergee

झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या - छगन भुजबळ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: शरद पवारांनी ट्विट करत ममता बॅनर्जींना दिल्या शुभेच्छा! काय म्हणाले...

लोकांनी घेतला भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय

लोकांनी भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असून तामिळनाडू, केरळमध्ये भाजप कुठे दिसत नाही असे मत देखील यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.