esakal | संजय राऊत म्हणतात, बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

संजय राऊत म्हणतात, बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: 'सगळ्या बळाचा वापर करूनही भाजपाचा पराभव झाला असून हा ममता दीदींचा ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा विजय निश्चित होत आहे. बंगालमध्ये सध्या तृणमूल २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपने केंद्रीय संस्थांनाही कामाला लावले होते. बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय झाला आहे. ममताजींनी एकहाती विजय मिळवला आहे.

हेही वाचा: 'लोकशाहीच्या पद्धतीने ममतादीदींनी भाजपाला चपराक दिली'

सध्याच्या निकालात तृणमूल आघाडीवर आहे. तर भाजपा ८६ जागांवर आघाडीवर आहे.