Coronavirus : आपण कोरोनावर विजय मिळवणारच; पण...: शरद पवार

Sharad Pawar do live Facebook chat today with people
Sharad Pawar do live Facebook chat today with people

मुंबई : कोरोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे. त्यांनी आज दुसऱ्यांदा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार म्हणाले, 'घरातच थांबा, बाहेर पडू नका. लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. हे संकट मोठं आहे. पुढचे काही महिने आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. कोरोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे, असेही पवारांनी सांगितले आहे.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

जनतेशी फेसबुकवरून संवाद साधताना पवार यांनी जनतेचे मनोबल वाढवतानाच कोरोनाच्या आजारामुळे देशावर घोंगावत असलेल्या संकटाची जाणीव करून दिली. राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी अशी सूचना केली आहे.

त्याचबरोबर अशा काळात काळाबाजार होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आजच्या स्थितीतही राज्य सरकार सामंजस्यपणानं काम करत आहे. सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडू नका. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा, सूचनांचं पालन करा, असे आवाहनही पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com