esakal | दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

Fire at shop in Delhis Shaheen Bagh

दिल्लीतील शाहीनबागमध्ये काल (ता.२९) भीषण आग लागली. एनआरसी आणि सीएएच्या विरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या शाहीन बाग परिसरात रविवारी रात्री ही आग लागली होती. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीनबागमध्ये काल (ता.२९) भीषण आग लागली. एनआरसी आणि सीएएच्या विरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या शाहीन बाग परिसरात रविवारी रात्री ही आग लागली होती. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शाहीन बाग भागातील एका दुकानाला रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली होती. नंतर ती झपाट्याने परिसरात पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचत आगीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळवलं.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

स्‍थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, एका फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली होती. नेमकी आग कशामुळे लागली, हे समजू शकलं नाहा. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शाहीन बाग परिसरात काही दिवसांपूर्वी एनआरसी आणि सीएएच्या विरोधातील आंदोलन सुरु होते. तब्बल तीन महिने हे आंदोलन चालले. नंतर दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलन स्‍थळ रिकामे करण्यात आले होते.

Coronavirus : भारतात कोरोनाच्या बळीचा आकडा २७वर, तर एकूण आकडा...

पोलिसांनी थेट जेसीबीच्या मदतीने आंदोलकांचा टेंट काढून टाकला होता. शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्या महिलांना कोरोना व्हायरसचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली होती. मागील तीन महिन्यांपासून मुस्लिम महिला सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करत होत्या. या आंदोलनामुळे दिल्लीतील शाहीन बाग परिसर चर्चेत आला आहे.