Budget 2022 : IT स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; करदात्यांची निराशा | Income Tax | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax

Budget 2022 : IT स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; करदात्यांची निराशा

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) मांडायला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले गेल्याने सर्वसामान्य करदात्यांना (Tax Return) दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र, कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या पदरी निराश पडली आहे. (Latest Income tax slab rates 2022 News Update)

हेही वाचा: Budget 2022 : ऑनलाईन शिक्षणासाठी 100 चॅनल्स, स्थानिक भाषेतून शिक्षण

  • करदात्यांकडून फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे. (Nirmala Sitharaman Budget 2022)

  • या आधी प्राप्तीकर परतावा भरताना काही चूक झाली तर त्या करदात्याची चौकशी करण्यात येत होती.

  • या पुढे काही चुका झाल्या तर त्याची चौकशी होणार नाही. त्या चुकामध्ये सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.

  • सहकारी सोसायट्यांसाठी असणारा किमान पर्यायी कर (alternate minimum tax) टॅक्स हा 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा एनपीएस यावर्षीपासून समान करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Budget 2022 : गतिशक्ती कार्गो टर्मिनलची घोषणा, २५ हजार किमीचे महामार्ग तयार करणार

गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आयकराचा स्लॅब

  • प्राप्तिकराच्या नवीन स्लॅबमध्ये 2.5 लाख वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही.

  • 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागतो.

  • 5 ते 7.5 लाखांपर्यंत 10 टक्के आणि 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत 15 टक्के आयकर भरावा लागेल.

  • याशिवाय 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने आयकर भरावा लागतो.

Web Title: Budget 2022 Income Tax Slabs Unchanged Nirmala Sitharaman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top