esakal | Budget 2021: शेअर मार्केटमध्ये उसळी; बजेटच्या भाषणाचा यांना झाला 'छप्पर तोड' फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

share market

आज बजेट मांडल्यानंतर गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसून येत आहेत. 

Budget 2021: शेअर मार्केटमध्ये उसळी; बजेटच्या भाषणाचा यांना झाला 'छप्पर तोड' फायदा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या या बजेटनंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची झोळी आज चांगलीच भरली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सातत्याने पडझड दिसून येत होती. मात्र आज बजेट मांडल्यानंतर गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसून येत आहेत.  आज बजेट सादर होणार असल्याने शेअर मार्केट वधारलं होतं. यानंतर सातत्याने ते तेजीत असलेलं दिसून आलं. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर बाजारात चांगली तेजी दिसून आली. ब्रॉडर मार्केटमध्ये आज बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप दोन्हीही चांगल्या गतीमध्ये दिसून आले. तर सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सदेखील 650 अंकांनी तेजीत दिसून आला.  दिवसभराच्या कारभाराच्या सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्समध्ये 30 स्टॉक्समध्ये केवळ तीन स्टॉक्सच लाल निशाण्यावर दिसून आले.

हेही वाचा - BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार

सोमवारी दिवसभर कारभारानंतर बीएसई सेन्सेक्स 2,314 अंकावर म्हणजेच 5 टक्के वृद्धीसह 48,600 अंकांवर क्लोज झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 देखील 646 अंकांच्या वृद्धीसह 14,280 अंकांवर क्लोज झाला.  आज इंड्सइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, एचडीएफसीच्या स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी पहायला मिळाली. तर यूपीएल, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टेक महिंद्रा, सिप्ला आणि हिंदूस्थान युनिलिव्हरच्या स्टॉक्समध्ये विक्री झाली. 

बँकींग सेक्टर्समध्ये जबरदस्त तेजी
आज सर्वच क्षेत्रामध्ये वाढ दिसून आली. सर्वांत मोठी तेजी आज इंश्यूरन्स सेक्टर, बँकींग, कॅपिटल गुड्स, कन्झ्यूमर ड्यूरेबल्सच्या शेअर्समध्ये दिसून आली. मेटल स्टॉक्समध्ये देखील चमक दिसून आली. अर्थमंत्र्यांनी आज सरकारी बँकांच्या भांडवलावर 20 हजार कोटींचा खर्च करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इन्श्यूरन्स सेक्टरसाठी एफडीआयच्या नियमांअंतर्गत 49 टक्क्यांच्या मर्यादेला वाढवून 74 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणुकदारांच्या उत्साहात वाढ दिसून आली. 

10 मधले 6 वेळा लाल निशाण्यावर सेन्सेक्स
2012 आणि 2013 मध्ये बजेट सादर केल्यानंतर बीएसई सेन्सेक्स जवळपास 1 टक्क्याहून अधिक टक्क्यांनी घसरला  होता. याचप्रकारे 2014, 2016 आणि 2018 मध्ये क्रमश: 0.28 टक्के, 0.66 टक्के आणि 0.16 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. मात्र गेल्या 10 वर्षांत 4 वर्षे अशी देखील होती जेंव्हा बजेट सादर झाल्यानंतर मार्केट हिरव्या निशाण्यावर क्लोज राहू शकला. वर्ष 2011, 2015, 2017 आणि 2019 मध्ये सेन्सेक्स क्रमश: 0.69 टक्के, 0.48 टक्के, 1.75 टक्के आणि 0.58 टक्क्यांच्या वृद्धीने क्लोज झाला. 
गुंतवणुकदारांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा
शेअर बाजारातमध्ये या तेजीचा सर्वाधिक फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. आज दिवसभरात त्यांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 1.86 लाख कोटी रुपयांवर होते. मात्र, सोमवारी दिवसभराच्या कारभारानंतर ते वाढून 1.92 लाख कोटी रुपयांच्या पार गेलं आहे. याप्रकारे फक्त एका दिवसाच्या कारभारानंतर गुंतवणूकदारांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

loading image