Defence Budget 2021: संरक्षण क्षेत्रात भरीव तरतूद; राजनाथ सिंहांनी मानले मोदींचे आभार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 1 February 2021

सोमवारी देशाचा बजेट सादर झाला

नवी दिल्ली union budget 2021- सोमवारी देशाचा बजेट सादर झाला. संरक्षण क्षेत्रासाठी (defence budget) भरीव तरतूद केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. संरक्षण बजेट 4.78 लाख कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आर्थिक वर्षे 2021-22 मधील बजेट गेल्या 15 वर्षातील सर्वात मोठे असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत. 

Budget 2021: कुणाला दिलासा, कुणाला निराशा; बजेटसंबंधी 10 महत्त्वाच्या बातम्या...

चीनसोबत सीमेवर तणाव असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 4,78,195.62 कोटी रुपयांची घोषणा केली. यामध्ये माजी सैनिकांच्या पेंशनचाही समावेश होतो. मागील वर्षी 4,71,378 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी बजेटमध्ये 4.78 लाख कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

राजनाथ सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, मी विशेष करुन पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानतो. त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी बजेट 4.78 लाख कोटी रुपयांनी वाढवलं. गेल्या पंधरावर्षातील ही सर्वात मोठी तरतूद आहे. राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात अनेक ट्विट केले आहेत. 

मोदी सरकारने शेतकरी, शेती, पायभूत सुविधा, आरोग्य यासाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच अनेक नव्या योजना आणण्यात आल्या आहेत. देशात नवे 100 सैनिकी स्कूल सुरु करण्यात येतील, याचा आनंद आहे, असं राजनाथ म्हणाले आहेत. देशात सध्या 25 कार्यरत सैनिकी स्कूल आहेत. संरक्षण क्षेत्रात येणारे अधिकारी घडवणे हे या सैनिकी स्कूलचे काम आहे.

रिपोर्टनुसार, संरक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी गेल्या काही वर्षांपासून भरीव तरतूद केली जात आहे. 2020-21 मध्ये लष्कराला आपात्कालीन खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence Budget 2021 22 updates rajnath singh pm modi finance minister