
डॉ. अतुल रा. देशपांडे
आंतरविद्याशाखीय विषयाचे अभ्यासक
देशातल्या सर्वच उत्पन्नगटातल्या लोकांचा उपभोग वाढावा ही रास्त गोष्ट आहे; पण मध्यमवर्गीयांच्या उपभोग खर्चावर प्रतिकूल परिणाम करणारे घटकही असतात. उदाहरणार्थ, अन्नपाण्याच्या वाढणाऱ्या किमती, वेतनातील घसरण, वाढत जाणारे कर्ज, या घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा विकास आणि भाववाढ याचा समतोल साधणारा मार्ग दिसणार नाही.