‘Bougette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला 'बजेट' शब्द

'बजेट' या शब्दातच या बजेटवाल्या बॅगचे गुपित दडले आहे.
Budget bag
Budget bag Google

येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (Budget 2022-23) त्यापूर्वी आपण नेमका बजेट हा शब्द कसा आणि कोणत्या शब्दापासून अस्तित्त्वात आला याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच तीन वर्षांपूर्वीपर्यंत वापरण्यात येणाऱ्या कापडी पिशवीची जागा ब्रिफकेसने घेतली. त्यासह यामध्ये आपण अर्थसंकल्पची वैशिष्ट्ये आणि अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मंत्र्यांबद्दल देखील जाणून घेणार आहोत. (History Of Budget Briefcase )

Budget bag
Budget 2022 : रेल्वेअर्थसंकल्प कधी अन् का बंद झाला ? वाचा रंजक माहिती

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यापूर्वी बजेट बॅग (Budget Bag) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाली आणि या बॅगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, 'बजेट' या शब्दातच या बजेटवाल्या बॅगचे गुपित दडले आहे. बजेट हा शब्द ‘Bougette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो लेदर बॅग.

Budget bag
Budget 2022 : 'या’ अर्थमंत्र्यांनी मांडला नव्हता एकही अर्थसंकल्प! वाचा असं का?

तसे बघायला गेले तर, ही प्रथा खर तर ब्रिटीशांची आहे. 1860 मध्ये ब्रिटीश चान्सलर विल्यम ग्लॅडस्टोन यांनी ही प्रथा सुरु केली होती. तर, ही पहिली बजेट बॅग ग्लॅडस्टोन बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे. बजेटसाठी हीच बॅग पुढच्या चान्सलरकडे हस्तांतरित करण्यात आली. पण ही बॅग खूप जुनाट झाल्याने 2011 मध्ये ही प्रथा ब्रिटनने बंद केली.

भारतीय अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आणि सादर करणारे मंत्री

1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. मात्र निर्मला सीतारमण यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

Budget bag
Budget 2022 : "नवीन घोषणा पुरे, प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावा"

या मंत्र्यांनी सादर केला तब्बल सात वेळा अर्थसंकल्प

यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सीडी देशमुख यांनी प्रत्येकी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर, त्या पाठोपाठ डॉ. मनमोहनसिंग यांना सहा वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. तर, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममधील अखेरचं बजेट (अंतरिम बजेट 2019) पियूष गोयल यांनी सादर केलं होतं. 5 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com