चौथ्यांदा बजेट मांडून निर्मला सीतारामन यांनी केला असाही विक्रम

Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanPTI

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या या अर्थसंकल्पानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकीकडे गेली दोन वर्षे देश कोरोनाच्या संकटामुळे देश होरपळून निघालेला असताना आर्थिक आघाड्यांवर मोठ्या समस्यांना दोन हात करावे लागत आहेत. आजच्या या अर्थसंकल्पानंतर एक वेगळा विक्रम समोर आला आहे.

Nirmala Sitharaman
बजेटमधून मिळाला 'एवढा मोठा भोपळा'; राहुल गांधींची खोचक प्रतिक्रिया

चौथ्यांदा मांडला अर्थसंकल्प

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर चार वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. सीतारामन यांनी यापूर्वी २ तास ४० मिनीटे अर्थसंकल्प वाचला होता. आज त्यांनी १ तास ३३ मिनीटे अर्थसंकल्प वाचन केले. मात्र अर्थसंकल्प पूर्ण होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत ज्यांनी २०२०मध्ये अर्थसंकल्प मांडताना २ तास ४० मिनिटे एवढे प्रदीर्घ भाषणाचा विक्रम केला आहे. यात दुसरा क्रमांक दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आहे. त्यांनी २ तास १० मिनिटे भाषण केले होते.

Nirmala Sitharaman
Budget 2022: 'देशातील मध्यमवर्गीयांचा केंद्राकडून विश्वासघात'

भारतीय अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताचा ९२ वा अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर केला.

- स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत आतापर्यंत ७३ वार्षिक, १४ अंतरिम आणि चार विशेष अर्थसंकल्प जाहीर झाले आहेत.

- सर्वसाधारणपणे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. पण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले होते.

- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुगम यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केले होते.

- ब्रिटिशकालीन परंपरेनुसार २००० या वर्षापर्यंत अर्थसंकल्प सायंकाळी पाच वाजता सादर होत असे. ही परंपरा सर बेसिल ब्लँकेट यांनी १९२४मध्ये सुरू केली होती.

- २०२१मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात प्रथमच सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प जाहीर झाला होता. त्यावेळी यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com