Budget 2022 : अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा; तज्ज्ञांचे मत

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असून त्यात त्यांच्यासाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे.
union budget 2022
union budget 2022sakal
Summary

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असून त्यात त्यांच्यासाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे.

पुणे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प (Budget) महत्त्वाचा (Important) असून त्यात त्यांच्यासाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे. करविषयक कोणत्याही कायद्यात (Law) बदल करताना त्याचा करदात्याला त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आयातीवरील कर कमी होर्इल. वर्क फार्म होमसाठी आवश्‍यक असलेल्या बाबींच्या किमती कमी करणे आवश्‍यक होते. मात्र अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याचे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी (Expert) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) च्यावतीने आयोजित चर्चेत व्यक्त केले.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींत ३५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. तसेच त्यातून अर्थचक्राला देखील गती मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमर्इ) चांगली तरतूद करण्यात आली आहे. तर पत हमी कायम ठेवण्यात आली आहे. ही व्यवसासाठी चांगली बाब आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला देखील बूस्टर देण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता यंदाचा अर्थसंकल्प चांगला आहे.

- प्रशांत गिरबान, महासंचालक, एमसीसीआयए

जीएसटीबाबतचे निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये वर्षभर घेतले जातात. त्यामुळे अर्थसंकल्पात जीएसटी बदलाबाबतचे निर्णय अपेक्षित नव्हतेच. गेल्या डिसेंबरमध्ये देशातील आर्थिक घडामोडी चांगल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात जास्त कर जमा झाला आहे. यातून स्पष्ट होते की सर्व क्षेत्रांमध्ये आर्थिक उलाढाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याही कायद्यातील बदलाचा करदात्याला त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी. ऑटोमोबाईल आणि एव्हीला बूस्टर देण्यासाठी चांगले निर्णय घेण्यात आले आहेत.

- वामन पारखी, अध्यक्ष, इनडायरेक्ट टॅक्सेशन कमिटी, एमसीसीआयए

union budget 2022
Budget 2022 : राजधर्म कोणता? अर्थमंत्र्यांनी सांगितला महाभारतातला श्लोक

यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. खासकरून डिजिटल क्षेत्राला बूस्टर मिळणार आहे. कार्यालय आणि घर येथील कामाची व्याख्या बदलेल असे वाटले होते. तसेच घरून काम करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत कोणतेच निर्णय झाले नाहीत. क्रीप्टो करन्सी बद्दलचे गैरसमज आता दूर होणार आहे. कारण या करन्सीला आता पॅन आणि आधार लिंक होणार आहे.

- दीपक शिकारपुरकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ

कोरोनामुळे गेल्या दोन अडीच वर्षांत अनेकांना आरोग्याबाबत मोठा खर्च करावा लागला आहे. त्यामुळे याबाबत काही तरी सकारात्मक बदल अपेक्षित होते. पण ते झाले नाहीत. विवरण दाखल करण्याचा चांगला पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे लक्षात न राहिलेल्या व्यवहारांची नोंद करण्याच्या प्रणालीत बदल होणार आहे. हा निर्णय करदात्यांना मोठा दिलासा देणार आहे. दिव्यांग मुले, सरकारी नोकर यांच्यासाठी फायदेशीर व महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.

- सीए. डॉ. दिलीप सातभार्इ, कर तज्ज्ञ

union budget 2022
बजेटवेळी सभागृहातच राहुल गांधींचा डोक्याला हात, झाले ट्रोल

कस्टम कायद्यात यावेळी काही बदल करण्यात आले आहेत. अंतिम उत्पादनाचा आयात कर कमी करून भारतीय उत्पादकांना या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिला आहे. हा कर कमी केल्यामुळे वस्तू देखील कमी दरात विकत येईल. यातून एक चांगली स्पर्धा निर्माण होर्इल. आत्मनिर्भर भारतासाठी या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

- पी. सी. नंबियार, अध्यक्ष विदेशी व्यापार, एमसीसीआयए

एमएलएमर्इला अधिक बळ मिळावे यासाठी आवश्‍यक असलेले अनेक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत. गेल्या अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्या कायम ठेवत त्यात वाढ देखील करण्यात आल्या आहे. त्याचा या क्षेत्राला फायदा होर्इल. गेल्या काही दिवसांत स्टीलच्या किमती खूप वाढल्या आहेत. सेकंडरी स्टीलच्या आयातीवरील कर कमी केल्याने दर कमी होण्याची शक्यता आहे.

- संदेश सालियन, सदस्य एझिक्युटीव्ह कमिटी, एमसीसीआयए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com