Budget 2021 Updates: बजेट सफळ संपूर्णम्; मोदी सरकारवर आणखी 80 हजार कोटींचा बोजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2021 22

या बजेटचे लाईव्ह अपडेट्स खास आपल्यासाठी...

Budget 2021 Updates: बजेट सफळ संपूर्णम्; मोदी सरकारवर आणखी 80 हजार कोटींचा बोजा

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून आज 1 फेब्रुवारी रोजी 2021 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे रुतलेले अर्थचक्र पुन्हा एकदा गतीमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोनानंतर आता कुठे अर्थव्यवस्था हळूवार गतीने धावत आहे. मात्र, तीला योग्य दिशेची गरज असल्याने आजच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं विशेष लक्ष लागून आहे. आरोग्य क्षेत्र, सीमासंघर्षामुळे संरक्षण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सर्वसामान्यांकडून अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांबाबत हा अर्थसंकल्प काय सांगणार आहे, ही उत्सुकता आहे. आज 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. 'पेपरलेस बजेट' असं यंदाच्या बजेटचं वैशिष्ट्य आहे. 
या बजेटचे लाईव्ह अपडेट्स खास आपल्यासाठी... फक्त 'सकाळ'वर...

Updates :  

- बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात उसळी पहायला मिळाली. सेन्सेक्स 1420.03 अंकांनी वधारला आहे. तो आता 47,705.80 अंकांवर आला आहे. तर सध्या निफ्टी 362.70 अंकांनी वाढून 13,997.30 वर पोहोचला आहे.

- भारतात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना, त्यासाठी 3 हजार कोटींहून अधिक रकमेची घोषणा : FM निर्मला सीतारमण

- 75  वर्षे वयावरील लोकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरावा लागणार नाही

- उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटीने वाढवणार 
- कोरोनामुळे सरकारसमोर आर्थिक संकट; सरकारला 80 हजार कोटींच्या - निधीची गरज; त्यासाठी अनेक योजनांची तरतूद

- छोट्या करदात्यांचे तंटे सोडवण्यासाठी एक कमिटी

- खाजगी क्षेत्राच्या मदतीने 100 नव्या सैनिकी शाळा उभारणा

- कोरोनामुळे सरकारसमोर आर्थिक संकट; सरकारला 80 हजार कोटींच्या निधीची गरज; त्यासाठी अनेक योजनांची तरतूद : निर्मला सीतारमण

- सार्वजनिक बसेससाठी 18 हजार कोटींची तरतूद
- पुढीत 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्क
- पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद
- रस्त्यांसाठी 1.18 लाख कोटी रुपयांची तरतूद
- असंघटीत क्षेत्रासाठी केंद्राकडून नव्या पोर्टलची घोषणा
- अनेक सरकारी कंपन्यांचं निर्गुंतवणुकीकरण
- लहान सिंचन प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद
- समुद्र संशोधनासाठी 4 हजार कोटींची घोषणा

-सार्वजनिक बसेससाठी 18 हजार कोटींची तरतूद
 

- देशातील आणखी 100 शहरांमध्ये पाईपलाईनने गॅस पुरवठ्याची योजना  : निर्मला सीतारमण 

- लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणार : निर्मला सीतारमण

- देशात 100 नवीन सैनिकी शाळांची अर्थमंत्र्यांची घोषणा

- गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद : निर्मला सीतारमण


- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं उद्दीष्ट : निर्मला सीतारमण

- धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी 1.72 लाख कोटी : निर्मला सीतारमण

- अर्थसंकल्प वाचताना सेन्सेक्स 900 अंकानी वधारला

- आता एकट्याची कंपनी सुरू करता येणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा- निर्मला सीतारमण

- 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर : निर्मला सीतारमण
- अडचणीतील बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारकडून सहकारी बँकासाठी 20 हजार कोटींची तरतूद : निर्मला सीतारमण
- अर्थसंकल्प वाचताना सेन्सेक्स 800 अंकानी वधारला
- रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींची विक्रमी तरतूद

- विमा क्षेत्रातील विदेशी गु्ंतवणूक 49 वरून 74 टक्क्यांवर : निर्मला सीतारमण

- पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी 18 हजार कोटी रुपयांची तरतूद : निर्मला सीतारमण

- नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची घोषणा

- नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची घोषणा

- देशात मार्च 2022पर्यंत 8 हजार 500 किलोमीटर हायवे उभारणार : निर्मला सीतारमण

- पश्चिम बंगालमध्ये होणार 675 किलोमीटर हायवे; निर्मला सीतारमण यांची घोषणा

- वर्ष 2021-22 साठी भांडवल खर्चामध्ये वाढ करतो आहोत. यासाठी आपण 5.54 लाख कोटी रुपयांची तरतूद करत आहोत. 

- खासगी गाड्यांची फिटनेस टेस्ट आता 20 वर्षांनंतर होणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा 
माल वाहतूक गाड्यांची फिटनेस टेस्ट 15 वर्षांनंतर : निर्मला सीतारमण

- शहरी स्वच्छ भारत अभियानासाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद : निर्मला सीतारमण

- आरोग्य क्षेत्रासाठी 23 हजार कोटी  : निर्मला सीतारमण

- देशात तीन वर्षांत सात टेक्सटाईल पार्क होणार  : निर्मला सीतारमण

- कोविड व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद : निर्मला सीतारमण

- वायू प्रदूषणाचे आव्हान मोडून काढण्यासाठी 2 हजार 217 कोटी रुपये दिले  : निर्मला सीतारमण

- आत्मनिर्भर भारतसाठी जीडीपीच्या 13 टक्के पॅकेज : निर्मला सीतारमण

- 2021-22 चं हे बजेट सहा खांबावर उभे आहे. आरोग्य आणि कल्याण,  भौतिक आणि आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी भांडवलाचे पुनरुज्जीवन, नूतनीकरण आणि संशोधन आणि विकास, Minimum Govt & Maximum Governance : FM निर्मला सीतारमण

- नव्या दशकातील हे पहिलं बजेट आहे. 2021 चे हे बजेट पेपरलेस डिजीटल बजेट आहे. 

- सरकारने गरीबातील गरीब माणसापर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना, तीन आत्मनिर्भर भारत पॅकेजेस आणि त्याला जोडून इतर लहान मिनी बजेट्सची घोषणा करण्यात आली. : FM निर्मला सीतारमण

- सध्या भारताकडे दोन लसी उपलब्ध आहेत. फक्त भारतातील नागरिक नव्हे तर 100 हून अधिक देशांतील लोकांना सुरक्षित करण्याचे काम या लसी करत आहेत. तसेच अजून दोन लसी भारतात तयार होण्याची शक्यता आहे. : FM निर्मला सीतारमण

- मे 2020 मध्ये सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा दोन पॅकेजसची घोषणा करण्यात आली. याद्वारे सरकारकडून एकूण मदत जवळपास 27.2 लाख कोटींची करण्यात आली. 

- 800 दशलक्ष लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा. तसेच 80 दशलक्ष लोकांना मोफत गॅस दिला.

- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 2.76 लाख कोटी रुपयांची मदत आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत जाहीर करण्यात आली. 

- कोरोना संकटातून सावरण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर पॅकेजेसची घोषणा केली. कोरोना आळा घालण्यासाठी आता भारताकडे स्वत:च्या दोन लसी आहेत. - अर्थमंत्री

- संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे भाषण सुरु. विरोधकांचा गोंधळ 

- केंद्रीय मंत्रीमंडळाने बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजूरी दिली आहे. 

- अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल आणि गुरजीत सिंग औजला यांनी काळे कपडे घालून कृषी कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवला आहे. 

- लोकसभा स्पीकर ओम बिर्ला संसदेत दाखल झाले आहेत. 

- 2021-22 च्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळाची संसदेत बैठक सुरु

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर संसदेत पोहोचले आहेत. यंदाचं बजेट पेपरलेस असल्याने त्यांच्या हातात टॅब आहे. याआधी लेदर ब्रिफकेसवरुन वहिखाता आणण्याचा नवा पायंडा मोदी सरकारने पाडला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असे पेपरलेस बजेट भारताच्या इतिहासात सादर होत  आहे. 

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.  हर्षवर्धन संसदेत आले आहेत.

- अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत हजर

- अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. 

- यंदाचं बजेट कोरोनामुळे पेपरलेस असणार आहे. निर्मला सीतारमण पहिल्यांदाच बजेटचं सादरीकरण टॅबद्वारे करणार आहेत. याआधी बजेट 'वहिखात्या'तून आणलं जात होतं. त्याआधी ते लेदर ब्रिफकेसमधून आणून सादर केलं जायचं.

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थ मंत्रालयातून निघाले आहेत. कोरोनामुळे यावेळी पहिल्यांदाच हे 'बजेट पेपरलेस' बजेट असणार आहे. सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपात हे बजेट उपलब्ध होईल. 

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयामध्ये दाखल झाल्या आहेत. 

- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्थमंत्रालयात पोहोचले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उपस्थित असतील. 

- हे बजेट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे बजेट असेल. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या सरकारच्या मंत्रानुसार सरकार या बजेटमधील आत्मनिर्भर पॅकेजद्वारे भारताला एक नवी दिशा देईल. हे बजेट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे.  अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी हे बजेट उत्तम कामगिरी पार पाडणार आहे. 

- आज संसदेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या घरी प्रार्थना केली आहे.  

- बजेट टीमसोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण. आज सकाळी 11 वाजल्यापासून केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर केला जाईल.

loading image
go to top