
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर प्रथेप्रमाणे आज अर्थमंत्रालयात हलवा समारंभ झाला. दरवर्षी हलवा समारंभासोबत अर्थसंकल्प छपाईला प्रारंभ होत असतो.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर प्रथेप्रमाणे आज अर्थमंत्रालयात हलवा समारंभ झाला. दरवर्षी हलवा समारंभासोबत अर्थसंकल्प छपाईला प्रारंभ होत असतो. मात्र कोरोना संक्रमणामुळे यंदा अर्थसंकल्प फक्त डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘युनियन बजेट‘ हे मोबाईल ॲपही आज लॉंच केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्रालयात गेल्या काही आठवड्यांपासून काम सुरू आहे. मात्र, कोरोना कारणामुळे यंदाचा हलवा समारंभ होणार नसल्याचीही चर्चा सुरू झाली होती. अर्थमंत्रालयाकडून याचा इन्कार करण्यात आला. त्यानंतर अर्थसंकल्पाची निर्मिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर आज हलवा समारंभ झाला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यमंत्री अनुराग ठाकूर, वित्त आणि महसूल सचिव अजयभूषण पांडेय, सचिव (व्यय) टी. व्ही. सोमनाथन, सचिव (आर्थिक व्यवहार) तरुण बजाज, सचिव (डीआयपीएएम) तुहीन कांता पांडेय, सचिव (वित्तीय सेवा) देबाशिष पांडा यांच्यासह अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.
ॲपचे उदघाटन
अर्थमंत्र्यांनी हलवा समारंभातच युनियन बजेट मोबाईल ॲप या ॲपचेही उद्घाटन केले. यात अर्थसंकल्प (आर्थिक ताळेबंद), अनुदान विषयक मागण्या, वित्त विधेयक आणि इतर दस्तावेज बघता येतील. या ॲपवर हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये अर्थसंकल्प आणि अन्य दस्तावेज वाचण्याची तसेच करण्याचीही सोय असेल. हे ॲप अर्थसंकल्पाचे संकेत स्थळ (www.indiabudget.gov.in) यावरूनही डाऊनलोड करता येईल. अर्थमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर या ॲपवर दस्तावेज मिळतील.
Edited By - Prashant Patil