Budget 2021 : बजेटनंतर सोनं घसरलं; सराफांच गणित बिघडलं, ग्राहकांची चांदी

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

एका बाजूला सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली असताना दुसऱ्या बाजूला चांदीचे दर गडाडले आहेत.

Gold Silver Price on Union Budget 2021 Day : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी संसंदेत अर्थसंकल्प सादर केला. सरकारच्या आगामी वर्षांतील धोरणाचा शेअर बाजार आणि अन्य उद्योगांवर परिणाम होत असतो. सराफ बाजारामध्येही यामुळे चांगलाच बदल झाल्याचे पाहायला मिळाले.  निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अनेक घोषणा केल्या. यात  सोने-चांदी (Gold-Silver Rate) वरील सीमा शुल्क (कस्टम) ड्यूटीमध्ये कपात करण्यात आल्याची घोषणा केलीय.

यामुळे सोने चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे.  सोने-चांदी यावरील कस्टम ड्युटी  12.5 टक्क्यांवरुन 7.5 टक्के इतकी कपात करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. 

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली. प्रति 10 ग्रॅमचा दर 49 हजार पेक्षा खाली घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये  गोल्ड फ्यूचर्स रेटमध्येही घट झाली आहे.  एमसीएक्सवर सोने वायदा( Gold Rate) 796 रुपयांच्या घसरणीसह 48300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. MCX वर 5 फेब्रुवारीला सोन्याचे दर 1.62 टक्के घटीसह सोने 48300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. 
चांदीला चकाकी

एका बाजूला सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली असताना दुसऱ्या बाजूला चांदीचे दर गडाडले आहेत. चांदीच्या दरात 3345 रुपयांनी वाढ झाली असून प्रति 1 किलो चांदीचा दर 73071 रुपयांवर पोहचला आहे.  चांदीचा भाव 6 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 updates gold silver Price budget announcement gold rate fall silver shine