Union Budget 2022 : नव्या ४०० वंदे भारत ट्रेन्सची घोषणा; नव्या शहरात मेट्रोचं जाळं पसरवणार| Announcement of new 400 vande bharat trains and metro of various cities | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Budget 2022 News Updates 400 new vande bharat trains
Union Budget 2022 : नव्या ४०० वंदे भारत ट्रेन्सची घोषणा; नव्या शहरात मेट्रोचं जाळं पसरवणार

Union Budget 2022 : नव्या ४०० वंदे भारत ट्रेन्सची घोषणा; मेट्रोचं जाळही वाढवणार

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) ठेवला. या अर्थसंकल्पात त्यांनी भारतीय रेल्वेसाठी महत्वाची घोषणा केली. (Railway Budget 2022 News Updates) त्यांनी नव्या ४०० वंदे भारत ट्रेन्सची घोषणा केली. याचबरोबर देशातील विविध शहरात मेट्रोचं जाळं वाढवणार असल्याचीही घोषणा केली.

हेही वाचा: Budget 2022 Live: 'स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे हा अर्थसंकल्प'

निर्मला सीतारमण आज कोरोनाच्या आर्थिक फटक्यातून सावरणाऱ्या रेल्वेसाठी (Indian Railway) काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. निर्माला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी नव्या ४०० वंदे भारत ट्रेन्स (Vande Bharat Trains) सुरू करणार असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांनी देशातील विविध शहरात त्यांच्या गरजेनुसार मेट्रोचं (Metro Railway) जाळं वाढवणार असल्याचही सांगितलं.

याचबरोबर अर्थमंत्र्यांनी दळणवळण क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठीही घोषणा केल्या आहेत. पुढील तीन वर्षात ४०० नव्या वंदेभारत ट्रेन्स तयार करणार तसेच २०२२-२३ दरम्यान राष्ट्रीय महामार्गांची लांबी २५०० किमीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. रेल्वेची सुरक्षा आणि क्षमता वाढवण्यासाठी स्वदेशी कवच तंत्रज्ञानांतर्गत 2,000 किमी नेटवर्क उभारणार आहे.

हेही वाचा: Union Budget 2022: शेअर मार्केटची सकारात्मक सुरूवात

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे, लहान शेतकरी आणि सुक्ष्म, मध्यम उद्योगांसाठी नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा विकसित केली जाणार आहे. तसेच टपाल आणि रेल्वे नेटवर्कच्या एकत्रीकरणात पुढाकार घेतला जाणार आहे. एक स्टेशन, एक उत्पादन ही संकल्पना राबवली जाणार आहे.

Web Title: Union Budget 2022 Railway Budget 2022 News Updates Announcement Of New 400 Vande Bharat Trains And Metro Of Various Cities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top