Union Budget 2025 : विकासाची इंजिनगाडी

विविध राज्यांच्या सरकारबरोबर भागीदारी करून कमी कृषी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्रम राबविणार
industry
industrysakal
Updated on

१ ले इंजिन - कृषी

  • पंतप्रधान धनधान्य कृषी योजना : विविध राज्यांच्या सरकारबरोबर भागीदारी करून कमी कृषी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्रम राबविणार

  • ग्रामीण समृद्धी : कृषीक्षेत्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवे प्रयोग यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १०० जिल्ह्यांचा विकास करणार

  • डाळींमध्ये स्वयंपूर्णता : सहा वर्षांसाठी ‘डाळींमध्ये आत्मनिर्भरता’ आणण्यासाठी अभियान. तूर, उडीद आणि मसूरवर विशेष भर. पुढील चार वर्षे या डाळी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची नाफेड आणि एनसीसीएफला परवानगी

  • भाज्या व फळांसाठी एकात्मिक कार्यक्रम : शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, पुरवठा, प्रक्रिया आणि समाधानकारक मोबदला यासाठी प्रोत्साहन देणार

  • बिहारमध्ये मखाना मंडळ : मखाना उत्पादनवाढ, प्रक्रिया, गुणवत्तावाढ आणि वितरणासाठी.

  • उच्च उत्पादक बियाणांसाठी राष्ट्रीय अभियानाअंतर्गत अशा बियाणांचे संशोधन व विकास करणे

  • मत्स्यव्यवसाय : भारताच्या सागरी आर्थिक क्षेत्रात शाश्‍वत मासेमारी करता यावी यासाठी आराखडा. अंदमान-निकोबारवर विशेष भर

  • कापूस उत्पादनासाठी अभियान : कापूस उत्पादन वाढविण्याचे आणि चांगल्या गुणवत्तेचे नवे वाण विकसित करण्याचे उद्दिष्ट

  • किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत.

  • आसाममधील नामरूप येथे १२.७० मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com