- प्रदीप लोखंडे, संस्थापक, रूरल रिलेशन्स
अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य संस्थांबरोबर टपाल कार्यालये सक्षमीकरणावर भर दिला. पिण्याच्या पाण्यासारख्या महत्त्वाच्या बाबीची घोषणा झाली. मात्र, सौरऊर्जा-ग्रामीण स्वच्छतेबाबत सध्यातरी कुठलीही तरतूद दिसली नाही.
शिक्षण क्षेत्रासाठी संरक्षण क्षेत्राएवढीच तरतूद असली पाहिजे. यंदा अर्थसंकल्पात पीक पद्धतीत बदलाचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. मिश्र पीक पद्धतीचा अवलंब गरजेचे आहेच. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. शाळा, आरोग्याबाबत चांगले निर्णय घेतले आहेत.