
अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी आपल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त म्हणजे दहा वेळा संसदेत बजेट सादर केले आहे.
नवी दिल्ली - दरवर्षी प्रणाणे यावर्षीही १ फ्रेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडले जाणार आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट मांडणार आहेत. परंतु, या बजेट विषयी अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. अशीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे निर्मला सीतारामन या आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून बजेट मांडणाऱ्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. आतापर्यंत हा मान दोनच महिला अर्थमंत्र्यांना गेला आहे.
यंदा कोरोनासारख्या महामारीमुळे करण्यात आलेला लॉकडाऊन, परिणामी मंदावलेली अर्थव्यवस्था, शून्याखाली गेलेला अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर, कमी झालेला रोजगार या सगळ्या गोष्टींमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. परंतु, याहीपेक्षा आपण हे बजेट कधीपासून मांडले जावू लागले यासह काही महत्वाच्या बाबी पाहणार आहोत.
1)भारतात १८६० मध्ये इंग्रजांच्या काळात सर्वात प्रथम बजेट मांडण्यात आले. पहिले बजेट १८ फेब्रुवारी १८६० ला मांडण्यात आले.
2)१८६७ पासून भारतात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष सुरू झाले. त्याआधी ते १ मे ते ३० एप्रिलपर्यंत असायचे.
3)स्वातंत्र्याच्या आधी शेवटचे बजेट ऑल इंडिया मुस्लिम लीगचे लियाकत अली खाँ यांनी ९ ऑक्टोबर १९४६ पासून १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत सादर केले होते.
4)स्वतंत्र भारताचे पहिले बजेट २६ नोव्हेंबर १९४७ ला आर. के. षण्मुखम शेट्टी यांनी सादर केले होते.
5)भारतात हे बजेट दर वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत अर्थमंत्री सादर करतात. परंतु, पंडित जवाहरलान नेहरू पहिले पंतप्रधान आहेत त्यांनी पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर केले आहे.
6)जॉन मथाई आजाद भारताचे दुसरे अर्थमंत्री आहेत ज्यांनी १९४९-५० चे बजेट सादर करताना ते पूर्ण वाचले नाही. तर बजेटमधील ठराविक मुद्देच वाचले होते.
7)सी. डी. देशमुख रिझर्व बॅंकेचे एकमेव गव्हर्नर आहेत ज्यांनी १९५१-५२ मध्ये बजेट सादर केले होते.
8)१९५५-५६ पासून बजेट हिंदीतूनही तयार करण्यात येवू लागले. त्याआधी फक्त इंग्रजीतूनच बजेट तयार केले जात असे.
9) अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी आपल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त म्हणजे दहा वेळा संसदेत बजेट सादर केले आहे. देसाई हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात पाच वर्षे आणि इंदिरा गांधींच्या कार्यकाळात तीन वर्षे अर्थमंत्री होते.
10)१९६४ आणि १९६८ मध्ये मोरारजी देसाई यांनी आपल्या वाढदिवसादिशी बजेट सादर केले होते. वाढदिवसादिवशी बजेट मांडणारे ते एकच अर्थमंत्री आहेत. शिवाय देसाई यांनी चार वेळा उपपंतप्रधान असताना बजेट मांडले आहे.
11) मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वित्तमंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. संसदेत अर्थसंकल्प मांडणाऱ्या इंदिरा गांधी आतापर्यंतच्या एकमेव महिला अर्थमंत्री होत्या. १९७० ला इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्यानंतर गेल्या वर्षी निर्मला सीतारामण अर्थसंपल्प मांडला. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर बजेट मांडणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत ज्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला आहे.
12) तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी १९९२-९३ ला अर्थव्यवस्था मुक्त केली. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देवून आयात कर कमी केला होता.
13) २००० पर्यंत इंग्रजी परंपरेनुसार अर्थसंपल्प हा सायंकाळी वाच वाजता सादर केला जात असे परंतु, २००१ पासून एनडीए सरकारने ही परंपरा मोडीत काढत सकाळी अकरा वाजता अर्थसंल्प सादर करण्यास सुरूवात केली. अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प मांडला.
14) मोरारजी देसाई नंतर सर्वांत जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणारे पी. चिदंबरम हे दुसरे अर्थमंत्री आहेत. ज्यांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला.
संपादन - धनाजी सुर्वे