सेलिब्रिटींचा गणपती बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

लाडक्‍या बाप्पाच्या आगमनासाठी सेलिब्रिटी खास नाशिकला आले असून, रोजच्या चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून तर काही तारखा पुढे ढकलून घरच्या गणरायाच्या आगमनासाठी नाशिकला हजेरी लावली आहे. कसा आहे, त्यांचा यंदाचा बाप्पा खास वाचकांसाठी..! 

आमच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा असतो. त्यासाठी खास मी सुटी काढून घरी नाशिकला येत असते. त्यादिवशी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येऊन आम्ही गप्पा मारतो. सोबत जेवण करतो. दर वर्षी शाडूची मूर्ती बसवतो. त्याचबरोबर सजावटीसाठी इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करतो. 
- संयमी खेर, अभिनेत्री

आमच्याकडे तीन दिवसांचा गणपती पाहुणा असतो. तो नेहमीसारखा इकोफ्रेंडली तर असणारच आहे; पण खाद्यपदार्थांमध्ये पत्नीने तयार केलेले नवनवीन खाद्यपदार्थांचाही समावेश असेल. हे सर्व पत्नी गिरिजाने सरप्राईज ठेवले आहेत. 
-चिन्मय उदगीकर, अभिनेता

दर वर्षी शाडूचीच मूर्ती आणतो. कागदाचे मखर, फुलांची सजावट यापासून आरास तयार करतो. या वेळी मी कागदापासून वडाचे झाड तयार करत आहे. अजून त्याचे काम सुरू आहे. आमच्याकडे गौरींचे थाटात स्वागत केले जाते. फराळ तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. 
-अर्चना निपाणकर, अभिनेत्री

आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. यंदा मी स्वत: गणपती तयार केला आहे. जनस्थानची सगळी मंडळी आमच्याकडे प्रसादासाठी येतात आणि त्यामुळे मोदक वगैरेची तयारी मी करत आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकला येऊन मी गणेशोत्सवाची सगळी खरेदी केली. 
- विद्या करंजीकर, अभिनेत्री

आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो. मी गौरींच्या राशीदेखील बसविते. बाप्पाला वाजतगाजत आणणे, लक्ष्मींसाठी फराळ करायचा या सगळ्यांमुळे आमच्या घरचे वातावरण अगदी बदलून जाते. आम्ही सगळे मिळून याची तयारी करतो. 
- चित्रा कुलकर्णी, अभिनेत्री

मी दर वर्षी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून निसर्गाचा देखावा साकारते. विकतचे साहित्य आणून मला गणेश सजावट करणे पसंत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाला पूरक अशा बाप्पाचे कोडकौतुक करायला मला आवडते. 
- पल्लवी कदम, अभिनेत्री

मी मुंबईत असल्याने मूर्तीची निवड आई आणि बहीण आशू करते. हे दहा दिवस उत्साही वातावरण निर्माण होते. बाबा असताना बाबांच्या हातूनच मूर्तीची स्थापना व्हायची. बाबा गेल्यानंतर मूर्तीची स्थापना माझ्या हातून होते. भालेराव कुटुंबीय एकत्र असल्यापासून आमच्याकडे दहा दिवस दोन बाप्पा असतात. गेल्या वर्षी विराजमान असलेले बाप्पा या वर्षी विसर्जित करतो. ते पण कृत्रिमरीत्या जेणेकरून पर्यावरणाला हानी पोचणार नाही. 
-किरण भालेराव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 nashik ganesh utsav celebraty actress