पुढल्या वर्षी लवकर या..म्हणत बाप्पाला जळगावात भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 September 2017

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, 
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी...
आभाळ भरले होते तु येताना, 
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना...
गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या...' 

अशी आर्त हाक देत जळगाववासियांनी विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, 
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी...
आभाळ भरले होते तु येताना, 
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना...
गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या...' 

अशी आर्त हाक देत जळगाववासियांनी विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.

गेल्या बारा दिवसांपासून लाडक्या बाप्पाच्या सेवेत असलेल्या भविकांनी आज गणरायाला 'गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या...' असा जयघोष विसर्जन मिरवणूक आणि मेहरून तलावावर विसर्जनासाठी आलेल्या भविकाकडून सुरु होता. सकाळी साडे अकराला महापालिकेच्या मनाच्या गणपतीची आरती होउन मिरवणुकीला सुरवात झाली.

मिवरवणुकीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पहण्यास मिळाला. अनेक मंडळा कडून लावण्यात आलेले ढोल पथक आपल्या कसरती दाखवताना दिसत होते. स्वागतसाठी ठिकठिकाणी स्टॉल लावून फुलांची उधळण केली जात होती. तसेच घरगुती स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी मेहरून तलावावर भविकांची गर्दी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Jalgaon News Ganesh immersion procession