Maratha Kranti Morcha: आयोजकांविरोधात नाशिकमध्ये गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 August 2018

नाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आज चौघांना अटक करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) सकल मराठा समाजातर्फे गंगापूर नाका येथे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र दुपारी काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेत, शहरातून मोर्चा काढला. यात काही तरुणांनी ज्या रस्त्यावरून मोर्चा काढला त्या मार्गावरील दुकानांवर दगडफेक केली. काही ठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात शुक्रवारी आंदोलनाचे आयोजक माजी महापौर प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अजय ऊर्फ मयूर निंबाळकर, कपिल शिंदे यांच्यासह 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोडप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

छायाचित्रणानुसार होणार धरपकड
आंदोलकांनी शहरभर काढण्यात आलेल्या मोर्चाचे छायाचित्रण पोलिसांनी केले असून, त्यामध्ये धुडगूस घालणारे, दगडफेक करणारे तसेच उघड्या दुकानांना बंद करण्यासाठी दहशत माजविणाऱ्यांचा शोध त्यावरून घेतला जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha maratha reservation agitation sponsor crime