#MarathaKrantiMorcha आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांशी संवाद साधून त्यात सहभाग घेण्यात येईल. त्याचवेळी डोंगरे वसतिगृह मैदानावर 9 ऑगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रविवारी (ता. 5) येथे सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला.

उच्च न्यायालयात दाखल असलेल्या मराठा आरक्षणविषयक याचिकेत सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातर्फे याचिका दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक समन्वयक समितीतर्फे ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आजपासून करणार जागर
- कलम 353 चा गैरवापर होत असल्याचा आरोप

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation