#MarathaKrantiMorcha गावितांनी आरोप सिद्ध करावा - क्रांती मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 August 2018

धुळे - नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी त्यांच्यावरील हल्लाप्रकरणी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेले आरोप व गुन्हा सिद्ध करून दाखवावा. तसे झाल्यास संबंधित क्रांती मोर्चासह आपापल्या राजकीय पक्ष, संघटनांना सोडचिठ्ठी देतील, असे आव्हान क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिले.

काही मराठा आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आंदोलनावेळी खासदार गावित यांच्या कारची तोडफोड झाली. अतिउत्साही आंदोलकांकडून हे कृत्य झाले. ते निंदनीय असून, याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, खासदार गावितांनी पंधरा ते वीस आंदोलकांवर पदाचा गैरवापर करत "ऍट्रॉसिटी'सह ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला. आंदोलकांना कारमध्ये खासदार गावित असल्याचे माहीत नव्हते. त्यांना कुठलाही अपशब्द वापरण्यात आला नाही, की धक्काबुक्की, हल्ल्याचा प्रयत्न झालेला नाही. कारमध्ये त्या आहेत हे बऱ्याच वेळानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्‍लिपवरून समजले. असे असताना खासदार गावित यांनी खोटा गुन्हा दाखल केला. तो त्यांनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेसह आरोपांनुसार सिद्ध करून दाखवावा. तसे झाल्यास क्रांती मोर्चाचे संबंधित पदाधिकारी मोर्चासह पक्ष, संघटनांना सोडचिठ्ठी देतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha reservation Agitation Heena Gavit crime