नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात विविधांगानी आंदोलन सुरू असताना, आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्यासाठीच्या बैठकीमध्ये येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजुने न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा सकल मराठा समाजातर्फे याचिकाही दाखल केली जाणार आहे.

गंगापूर रोड परिसरातील गंगोत्री कन्स्ट्रक्शन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीला सुनील बागुल, चंद्रकांत बनकर, अॅड.श्रीधर माने, हंसराज वडघुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांनी टप्याटप्याने ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे, न्यायालयीन लढाईसाठी विधी तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्ह्यातर्फे रिट याचिका दाखल केली जाणार आहे. राजकीय आणि बिगर राजकीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. शहर, तालुका, विधी आणि निधी संकलन, शिस्त, माध्यम, नियोजन समितीही स्थापन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्ह्याची समन्वय समिती
अॅड. श्रीधर माने, चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे, साहेबराव पाटील, प्रकाश मते, प्राचार्य हरिष आडके, हंसराज वडघुले, हिरामण वाघ, राजेंद्र शेळके, योगेश कापसे, डॉ. उमेश मराठे, हरिदादा निकम, संजय पाटील, साहबेराव दातीर, अशोक पाटील, सुरेश भामरे, सुरेश भामरे, ऍड. विजय कातोरे, मुकुंद भोसले, अशोक कदम, बाळासाहेब घडवजे, भारत निगळ, नाना बच्छाव आदी.