आरक्षणासह शिवसृष्टीच्या मागणीसाठी मराठा समाजाचा गुरुवारी ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

समाजबांधवानी आज तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे हि मागणी केली आहे. निवेदनात मराठा आरक्षण दि. ९ ऑगस्टपर्यंत घोषित करण्यात यावे तसेच शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा नसल्यामुळे मराठा समाजाची भावना दुखावली जात आहे. आज शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार, शिवसेनेचे शिक्षक मतदार संघाचे आमदार व भाजपाचे नगराध्यक्ष असे असतांना शहरात २०१९ च्या आत भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी. यासाठी ९ ऑगस्ट ला प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर संजय सोमासे, देविदास गुडघे, युवराज पाटोळे, सुधाकर पाटोळे, पंडित पवार, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब जगताप, आदित्य नाईक, अमोल निलख, सुमित खैरनार, शाम गुंड, राधाकृष्ण गुंड, प्रशांत जठार, बाळासाहेब मढवई, नितीन जाधव, अविनाश पाटील, प्रकाश खोकले, मच्छिंद्र आगवण, प्रमोद तक्ते, विशाल जठार, मनोज कोटमे, सागर कोटमे, रंगनाथ खोकले, वैभव ठोंबरे, भाऊसाहेब फरताळे, शंकर सोमवंशी, प्रकाश धांद्रे, विलास धांद्रे, विलास उशिर, मनोहर सोमासे, तुषार पाटोळे, सुनील सोनवणे, बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब जाधव, अण्णासाहेब सोमासे, सुरज गायकवाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Thiyya Agitation at Yevla for Shivshrushti demand with reservation